Homeशहर परिसरकल्याण ग्रामीण विधानसभेत भाजप कडून तयारी, दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर यांची...

कल्याण ग्रामीण विधानसभेत भाजप कडून तयारी, दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर यांची माहिती

दिवा:-कल्याण ग्रामीण विधानसभेत मतदारसंघ बांधणीचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू असून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी भूमिका भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. भारतीय जनता पार्टीच्या कल्याण लोकसभेतील पदाधिकाऱ्यांनी ही मागणी सातत्याने पक्षाकडे लावून धरली होती. मात्र युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्याने वरिष्ठांचा आदेश म्हणून भारतीय जनता पार्टीने महायुतीचे काम करत उमेदवार बहुमताने निवडून आणला. या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदार संघ भारतीय जनता पार्टीला मिळायला हवा अशी येथील स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे सचिन भोईर यांनी म्हटले आहे. सचिन भोईर यांनी दिवा न्यूज सोबत याबाबत बोलताना सांगितले की भाजपचे कार्यकर्ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात बांधणी करत असून ही विधानसभा भारतीय जनता पार्टीने लढवावी अशी भूमिका येथील स्थानिक कार्यकर्त्यांची आहे.तशी भूमिका आम्ही पक्षाकडे मांडली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार येथे निवडून येईल असा विश्वासही सचिन भोईर यांनी व्यक्त केला आहे. सचिन भोईर यांच्या या भूमिके नंतर महायुतीत सगळंच आलबेल नसल्याचे पुढे येत आहे. भारतीय जनता पार्टीने कल्याण ग्रामीण मतदारसंघावर दावा केल्यास महायुतीमध्येच या जागेसाठी रस्सीखेच सुरू होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!