ठाणे:- कळवा आणि मुंब्र्यात झालेल्या एका मागून एक अशा तीन हत्यांचे गुन्हा उघडकीस आणण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले आहे. हे गुन्हे घडल्यानंतर अवघ्या २४ तासात ते गुन्हे उघड करून पोलिसांनी मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे. या तिन्ही हत्येचे गुन्हे वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विटावा बस स्टॉपच्या मागे एका इसमाच्या डोक्यात दगड टाकून ७ मार्च २०२५ रोजी हत्या करण्यात आली होती. त्या इसमाची ओळख पटवून मारेकऱ्याला पकडण्याचे आवाहन पोलिसांना होते. हत्या झालेला इसम हा झारखंड येथील अनिल बेहरा (३५) असल्याचे समोर आले. तसेच त्याची वैयक्तिक करणातून संतोष महादेव लाड (४५) या केली होती. याची कबुली लाड यांनी पोलिसांना दिली.
दुसरी घटना, ११ मार्च २०२५ रोजी समोर आली. या घटनेत शीळफाटा खान कंपाउंड येथील झाकीर शहादत मोल्ला (३९) याचा गळा चिरल्याने ते जखमी केले होते. रुग्णालयात नेल्यावर झाकीर याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर पोलिसांनी मयत व अश्रफुल मोल्ला (३४) तसेच त्यांचे मैत्रिण प्रिया मंडल हे पश्चिम बंगाल येथील तिघे जे मिळेल ते मंजुरीचे काम करत समजले. तर, प्रिया व अश्रफुल रूस्तम मोल्ला यांचे प्रेमसंबंध होते. तर मयत झाकिर मोल्ला याचे प्रिया हिचेशी अनैतिक संबंध असल्याचे संशयातून अश्रफुल मोल्ला याने ११ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वा सुमारास घरामध्ये झाकिर याला दारू पाजुन तो झोपल्यावर त्याचा गळा चिरून फरार झाल्या होता. तसेच कल्याण रेल्वे स्टेशन येथून पसार होण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले. तसेच चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अशाप्रकारे हा ही खुनाचा गुन्हा २४ तासांचे आत उघडकीस आणण्यात आला आहे.
तिसरी घटना ही मुंब्र्यात १२ मार्च २०२५ रोजी समोर आली. या घटनेत मोहम्मद राहुल अजिम राईन (२५) याचे गळ्यावर दुखापत झाल्याने त्यास प्रथम कळवा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय त्यानंतर सायन रूग्णालय येथे औषधोपचारकामी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी संशयावरून सादिक इसाक सय्यद (१९) यास ताब्यात घेतले. तसेच त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. १० मार्च २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने मयत तसेच त्यांचे आजुबाजुचे घरातून ४-५ मोबाईल चोरी केले होते. ते मयतास समजलयाने मयत त्याचा मोबाईल घेवून जाण्यास आला असता, त्यावेळी झालेल्या झटापटीत सादिक याने कटर सारख्या हत्याराने मोहम्मद याचे गळयावर वार करून तेथून पळ काढला होता.या ही गुन्हयातील मारेकऱ्याला २४ तासांचे आत अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, संदिपान शिंदे तसेच अनिल शिंदे यांच्या पथकाने केली.