Homeठाणे-मेट्रोकळव्यात चारचाकी वाहनांवरती पडले झाड

कळव्यात चारचाकी वाहनांवरती पडले झाड

ठाणे :- कळवा पारसिक नगर या ठिकाणी पार्क केलेल्या ०२ चारचाकी वाहनांवरती झाड पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी, ज्या वाहनांवरती झाडे पडले त्या वाहनांचे नुकसान झाले आहे.
कळवा पारसिक नगर परिसरात झाड पडल्याची माहिती राजू भिसे नामक व्यक्तीने ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. याघटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पण ते झाड हर्षद पाटील आणि बसंतकुमार जोशी यांच्या मालकीच्या गाड्यांवर पडल्याने त्या चारचाकी गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.तसेच पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने कापून बाजूला करण्यात आली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

error: Content is protected !!