Homeठाणे-मेट्रोकॅडबरी ब्रिज खाली यु टर्नला कंटेनर उलटला; या अपघातात चालक किरकोळ जखमी

कॅडबरी ब्रिज खाली यु टर्नला कंटेनर उलटला; या अपघातात चालक किरकोळ जखमी

ठाणे: कॅडबरी ब्रिज खाली यु टर्न जवळ माजीवाडा कडे जाणाऱ्या रोडवरती कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर उलटल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास समोर आली. या अपघातात चालक कमलेश कुमार (२७) हा किरकोळ जखमी झाला आहे. तसेच या अपघातामुळे कॅडबरी ब्रिज येथे वाहतूक कोंडी झाली होती. तर उलटलेला कंटेनर एका बाजूला केल्यावर वाहतूक पूर्वपदावर आली.
जखमी चालक कुमार हे नवीमुंबई न्हावा-शेवा येथून गुजरात सुरत येथे कंटेनर घेवून निघाला होता. तो कंटेनर दुपारच्या सुमारास कॅडबरी ब्रिजखाली यु टर्न येथून जाताना चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटला आणि तो कंटेनर उलटला. याची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. या दोन्ही विभागांमार्फत उलटलेला कंटेनर सरळ करण्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान या अपघातात चालकाच्या दोन्ही पायांना व पाठीला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच कॅडबरी ब्रिज येथे वाहतूक कोंडी झाली. तर माजीवाडाच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!