दिवा:- दिवा शहरात कार्यरत असणाऱ्या कोकण प्रतिष्ठान या संस्थेचा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी दिनदर्शिका प्रकाशन व वितरण समारंभ संघटनेच्या कार्यालयात पार पडला.
दिव्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कोकण प्रतिष्ठान आणि आर.के. आर्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यातील मुलांसाठी माफक दरात चित्रकलेचे क्लास सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी कोकण प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाला दिव्यातील कोकणी बांधव मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.