Homeठाणे-मेट्रोकोरोनानंतर ठाण्यात क्षयरोगाची संख्या वाढली; अकरा महिन्यात आढळले ८ हजार ६८४ रुग्ण

कोरोनानंतर ठाण्यात क्षयरोगाची संख्या वाढली; अकरा महिन्यात आढळले ८ हजार ६८४ रुग्ण

महिलांचे प्रमाण ६० टक्के

ठाणे: ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनानंतर पुन्हा क्षयरोगी रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनामध्ये क्षयरोगी रुग्णांच्या तपासण्या कमी झाल्याने रुग्ण संख्येत ही घट झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यावेळी ६ हजार रुग्ण पुढे आले होते. मात्र २०२३ या वर्षात क्षयरोगाच्या तपासण्या वाढल्याने रुग्ण संख्येतही वाढ झाली. २०२३ च्या १ जानेवारीपासून ५ डिसेंबरपर्यंत ८ हजार ६८४ क्षयरोगी रुग्ण आढळून आले आहेत. विशेष आढळलेल्या रुग्णांमध्ये महिलांची प्रमाण हे ६० टक्के आहेत. तर, एकूण रुग्णांपैकी ७ हजार रुग्ण हे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण आहेत. तसेच आढळून येणाऱ्या रुग्णांवर महापालिकेमार्फत मोफत औषधोपचाराबरोबर चाचण्याही केल्या जात असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
        राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ठामपा कार्यक्षेत्रातील ६ लाख ९७ हजार लोकसंख्या असलेल्या अतिजोखमी परिसरात क्षय आणि कुष्ठरोग शोध मोहिम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेत त्यांच्यामार्फत १ लाख ३९ हजार घरामध्ये जाऊन त्या पथकांनी तपासणी केल्यावर क्षयरोगाचे ४ हजार ७७७ संशयित रुग्ण पुढे आले होते. त्यापैकी ४ हजार ८० जणांची थुंकी आणि छातीचे एक्सरे अशा चाचण्या केल्या. त्यामध्ये नवे ७७ जण क्षयरोग बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबरीने कुष्ठरोग या आजाराच्या तपासणीत ३ हजार ३६९ जण कुष्ठरोग संशयित म्हणून पुढे आले होते. त्यांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये नवे १० रुग्ण आढळले. तातडीने त्यांना उपचाराखाली आणले.
दरम्यान १ जानेवारी पासून ५ डिसेंबर या कालावधीत ठामपा कार्यक्षेत्रात ८ हजार ६८४ रुग्ण आढळले आहेत. ते रुग्ण तातडीने उपचाराखाली आले आहे. तर आढळणाऱ्या रुग्णांवर ठामपाकडून मोफत उपचार आणि सुविधा दिल्या जात आहे. एकूण रुग्णांमध्ये गतवर्षातील १० टक्के रुग्णांवर अजूनही उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.


अशा दिल्या जातात मोफत सुविधा
   या रुग्णांच्या बँक खात्यात दर महिन्याला ५०० रुपये जमा होतात.तर औषधांपूर्वी केलेल्या जाणाऱ्या चाचण्यांसह महागड्या चाचण्या ही खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत केल्या जातात. तसेच रुग्णांचे आणि नातेवाईकांचे मोफत डिजिटल एक्सरे काढले जातत. याशिवाय प्रोटीन पावडर ही मोफत दिली जाते. येवढेच नाहीतर खासगी डॉक्टरांकडून अशा रुग्णांची माहिती मिळाल्यावर त्यांनाही ५०० रुपये दिले जातात. याशिवाय रुग्णांना औषधोपचार जाऊन देणाऱ्या आशावर्क यांनी ५०० रुपये देण्यात येत आहे.

या वयोगटातील रुग्ण संख्या अधिक
या वर्षी आढळून आलेल्या क्षयरोगी रुग्णांमध्ये ६० टक्के रुग्ण या महिला असून ४० टक्के रुग्ण पुरुष आहेत. तसेच आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये १६ ते ३६ वयोगटातील रुग्ण संख्या अधिक आहे. या रुग्णांम औषधाने तसेच त्या आजाराच्या प्रकारानुसार केलेला व्यायाम आणि वेळीच योग्य आहार घेतल्याने हा आजार नक्की बरा होतो.असे ही सूत्रांनी सांगितले.

error: Content is protected !!