Homeठाणे-मेट्रोक्रेडाई एमसीएचआयच्या व्यवस्थापकीय समिती मध्ये झोपडपट्टी विकास समिती अध्यक्षपदी भूषण भानुशाली यांची...

क्रेडाई एमसीएचआयच्या व्यवस्थापकीय समिती मध्ये झोपडपट्टी विकास समिती अध्यक्षपदी भूषण भानुशाली यांची नियुक्ती

ठाणे :- एमसीएचआय क्रेडाईच्या नवीन व्यवस्थापकीय समितीमध्ये ठाण्यातील भूषण भानुशाली यांची व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि झोपडपट्टी विकास समिती च्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याच्या रियल इस्टेट व्यवसायात सकारात्मक काम करणाऱ्यांमध्ये भूषण भानुशाली यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या अनुभवाचा उपयोग आणि काम करण्याचे कौशल्य याचा निश्चितच फायदा रिअल इस्टेट व्यवसायाला होईल असा विश्वास एमसीएचआय क्रेडाईने व्यक्त केला आहे.
सामूहिक कौशल्य, आवड आणि समर्पण हेच रिअल इस्टेट व्यवसायात महत्वाचे असून हे सर्व गुण भूषण भानुशाली यांच्यात असून त्यांनी ठाण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात वाढ, नाविन्य आणि प्रगती करावी अशा शुभेच्छा त्यांना एमसीएचआय क्रेडाईने दिल्या आहेत. तसेच झोपडपट्टी विकास समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. भानुशाली यांचा अनुभव महत्वाच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी, विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच समाजासाठी संधी निर्माण करण्यासाठी मोलाचा ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. क्रेडाई एमसीएचआयच्या सदस्यांना आणि रिअल इस्टेट उद्योगाच्या हिताचा प्रचार करणे, सहकार्य आणि ज्ञानाचे आदान प्रदान करण्याची भावना वाढविणे, नियामक आव्हानांचा सामना करणे आणि धोरण सुधारणा करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणे. क्रेडाई एमसीएचआयच्या माध्यमातून प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेत वाढ करण्यासाठी भूषण भानुशाली निश्चितच यशस्वी ठरतील असेही त्यांनी नमूद केले.
भूषण भानुशाली यांना व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि झोपडपट्टी विकास समितीचे अध्यक्ष या पदावर काम करण्यासाठी क्रेडाई एमसीएचआयने शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!