Homeशहर परिसरखड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे; कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला फाटकी शाल आणि नासका...

खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे; कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला फाटकी शाल आणि नासका नारळ देऊन दिवा मनसेचा उपरोधिक निषेध

दिवा:- शहरातील खडड्यांच्या संदर्भात दिवा मनसेकडून शुक्रवारी खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचे आंदोलन घेण्यात आले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी सुरुवात करण्यात आली. पण हे खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केले.

साचलेल्या पाण्यात काँक्रिट ओतून हा रस्ता अजून जास्त खराब झाला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर संपूर्ण चिखल झालेला असून त्यातून वाट काढताना नागरिकांची आणि गाड्यांंची तारांबळ उडत आहे. त्यामुळे मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा फाटकी शाल आणि नासका नारळ देऊन सत्कार करण्याचे ठरवले. पण कार्यकारी अभियंता ऑफिसमध्ये उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा उपरोधिक सत्कार केला. यावेळी दिवा मनसेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!