डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार रिक्षा वाटप सोहळा
दिवा:- कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरातील माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने शहरातील गरजू महिलांसाठी मोफत रिक्षावाटप करण्यात येणार आहे.
सामाजिक उपक्रमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने शैलेश पाटील यांनी गरजू महिलांना रिक्षावाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले असून हा उपक्रम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडणार आहे.डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गरजू महिलांना मोफत रिक्षा वाटप केले जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी दिली.