Homeशहर परिसरखा.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शैलेश पाटील यांच्या वतीने गरजू महिलांना मोफत रिक्षा...

खा.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शैलेश पाटील यांच्या वतीने गरजू महिलांना मोफत रिक्षा वाटप

दिवा:-कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरातील माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने गरजू महिलांना मोफत रिक्षा वाटप करण्यात आले. हा उपक्रम डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडला.

सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने शैलेश पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते महिलांना रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी लाभार्थी महिलांनी आनंद व्यक्त करत शिंदे गटाचे आभार मानले.

या उपक्रमाबद्दल बोलताना माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी सांगितले की, गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा प्रयत्न असून भविष्यात असे आणखी उपक्रम राबवले जातील.कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे. माजी उपमहापौर रमाकांत मढवी. विभाग प्रमुख. भालचंद भगत. स्थानिक महिला रिक्षा चालक. नागरिक, पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!