रत्नागिरी:- खेड तालुक्यातील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई. वेरळ विद्यालयातील इयत्ता सहावी मधील कु. अभिज्ञ भानसे याने घवघवीत यश करून जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये राजापूर येथील शाळेमध्ये निवडही झाली आहे. संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री. सुयश पाष्टे प्रशालेचे प्राचार्य डॉ . एस . एस . अली, शैक्षणिक समन्वयक डॉ . अजित भोसले यांनी त्याचे कौतुक केले व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या विद्यार्थ्याला कु. जरीन बटे कु . स्नेहा जाधव , कु.भक्ती घडशी , कु.साची मोदी , कु . तेजश्री पुनस्कर व सौ . शोनाली कांगणे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. नवोदय मध्ये निवड झाल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.