ठाणे:- रिक्षा प्रवासात वर्तकनगर येथील पूनम चौधरी (२५) या तरुणीचा आयफोन १५ मोबाईल गहाळ झाला होता. तो फोन वर्तकनगर पोलिसांनी अवघ्या आठवड्यात परत केला असून त्या मोबाईल फोनची किंमत १ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्तकनगर, दोस्ती विहार येथे राहणाऱ्या चौधरी (२५) या ३० मार्च २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिक्षाने प्रवास करत होत्या. त्या वर्तकनगर नाका ते राहते घर असा रिक्षाने प्रवास करीत असताना त्या रिक्षामध्ये त्यांचा १ लाख रुपये किंमतीचा आयफोन 15 मोबाईल फोन गहाळ झाल्याची तक्रार त्यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. ती माहिती मिळताच तात्काळ वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण व पोलीस शिपाई नानासाहेब विठ्ठल नागरे यांनी त्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे कौशल्यपूर्ण तपास करून गहाळ झालेला तो मोबाईल फोन हस्तगत करून फिर्यादीला परत केला अशी माहिती पोलिसांनी दिली.