Homeठाणे-मेट्रोगांजा प्रकरणी रिक्षाचालक गजाआड ; लाखोंचा गांजा जप्त

गांजा प्रकरणी रिक्षाचालक गजाआड ; लाखोंचा गांजा जप्त

ठाणे :- गांजा विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद फिरोज जन्नत शेख (२७) या रिक्षाचालकाला ठाणे गुन्हे शाखेच्या पथक १ च्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख १३ हजार ७०० रुपयांचा १ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
साकेत रोड येथे गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी एक २५ ते ३० तरुण येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखे १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला गुरुवारी रात्री ( ता. २९) अटक केली. यावेळी त्याच्याकडून गांजासह रोख २२० रुपये मिळून आले. अटकेतील शेख हा कळवा शांतीनगर परिसरात राहणारा आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा १ चे पोलिस हवालदार शब्बीर फरास यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!