दिवा:-दिव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ठामपा माजी स्थायी समिती सभापती गोवर्धन भगत यांच्या जीवनचरित्रावर आधारित अष्टपैलू दादा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी सहा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस हे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.सदर पुस्तक प्रकाशन सोहळा गडकरी रंगायतन येथे 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पार पडणार असून या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर प्रकाशन सोहळ्यासाठी दिवा येथून नागरिकांना जाण्यासाठी दिवा हायस्कूल येथून बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.