ठाणे: कासारवडवली येथील सर्व्हे क्रमांक ८३,८४,८५,८६ आणि ८७ या जमिनीवर ६६ शेतकऱ्यांचा ताबा असतानाही त्यांच्या ताब्याचा विचार न करता मोजणी न करून, मोजणी केल्यासारखे दाखवून मोजणी नकाशा देऊन टाकला. अशा पद्धतीचे अनेक सर्व्हे घोडबंदरमध्ये करून घेतले आहेत. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा घोटाळा होईल. अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून व्यक्त करत हा सर्व्हेच करायचा नाही आणि नकाशा देऊन टाकायचा; ६६ लोकं जमिनीवर असताना तुम्ही त्यांना बेदखल कसे करू शकता? असा सवालही त्यानी उपस्थित केला आहे. तसेच यामध्ये मोहोळकर हे भ्रष्टाचार करणारे मुख्य अधिकारी आहेत. असा खळबळजनक आरोपही आव्हाडांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार आव्हाड यांनी 100 एकर वनजमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होणार असे ट्विट केले होते. त्यानंतर गुरुवारी आव्हाडांनी ट्वीट करत, खळबळ उडवली आहे. त्या ट्विटमध्ये कासारवडवली येथील सर्व्हे क्रमांक ८३,८४,८५,८६ आणि ८७ वरील शेतकऱ्यांनी या संदर्भात आपला तक्रार अर्ज भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक मोहोळकर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र, मोहोळकर यांनी हा अर्ज आपल्या ड्राॅव्हरमध्येच दाबून ठेवला अन् नकाशा बदलून देऊन टाकलाय. असा आरोप केला आहे. तसेच याच नकाशावर आता कोट्यवधी रूपयांचा टीडीआर उचलला जाणार आहे. म्हणजे, वाहत्या गंगेत किती हात धुवून घ्यायचे, यालाही काही मर्यादा असाव्यात ना ! आता बघू, या जिल्हाधिकारी किती कारवाई करतात ते! हा सर्व प्रकार मी पुराव्यासह देणार आहे. असल्याचे नमूद केले. याशिवाय यामध्ये मोहोळकर हे भ्रष्टाचार करणारे मुख्य अधिकारी आहेत. हे जे मी बोलत आहे; ते पुराव्यासह बोलत आहे. उगाच हवेत बोलत नाही. माझ्याकडे ६६ लोकांच्या सह्यांचा अर्जदेखील आहे.असेही आव्हाडांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
…..






