Homeठाणे-मेट्रोज्योती पाटील आयोजित फराळ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्योती पाटील आयोजित फराळ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिवा:- तनवी फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील या महिलांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. दिवाळीनिमित्त ज्योती पाटील यांनी तनवी फाउंडेशनच्या माध्यमातून फराळ स्पर्धेचे आयोजन केले होते.

ही स्पर्धा उत्साहात पार पडली यावेळी अनेक महिला उपस्थित होत्या.दिव्यातील शेकडो महिलांनी दिवाळी फराळ घरी बनवून आणला होता. चकली, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे, बिस्किट, शंकरपाळ्या, इत्यादी पदार्थ महिलांनी बनवले होते. तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.ज्योती पाटील यांनी विजेत्यांना १५ व ५ लि. तेलाचा डबा बक्षीस स्वरूपात दिला. या स्पर्धेत पहिला क्रमांक प्रणाली नाईक,द्वितीय क्रमांक विधी मोरे यांनी पटकावला तर जागृती म्हस्के,ऐश्वर्या फुटाणे,करुणा म्हात्रे,जान्हवी गुगले यांना देखील बक्षीस प्रदान करण्यात आली.सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

error: Content is protected !!