Homeशहर परिसरज्योती पाटील यांच्या वतीने दिव्यात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान...

ज्योती पाटील यांच्या वतीने दिव्यात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान उत्साहात संपन्न

दिवा:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व तन्वी फाउंडेशन दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने बी आर नगर येथे महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान दिव्यातील महिलांचा या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी दिवा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमाला दिवा शहरातील शेकडो महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सर्वसामान्य महिलांचे कौतुक करण्यासाठी ज्योती पाटील यांनी आयोजित केलेला सन्मान सोहळा बाबत मान्यवरांनी ज्योती पाटील यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख श्री दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटिका सौ.वैशाली दरेकर, जिल्हा युवा अधिकारी श्री प्रतीक पाटील दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, उपशहर संघटक प्रविण उतेकर ,विधानसभा संघटिका सौ.योगिता नाईक विभाग प्रमुख,महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवा सेना, गटप्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!