Homeठाणे-मेट्रोठाणे जिल्हा न्यायालयातील “हिरकणी कक्षा"चे उद्घाटन

ठाणे जिल्हा न्यायालयातील “हिरकणी कक्षा”चे उद्घाटन

ठाणे : जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गौरी गोडसे व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले .
     महिलांचे सबलीकरण व बालकांचे विकास योजनेंतर्गत जिल्ह्यांमध्ये गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी महिलांना आपल्या समवेत असलेल्या बालकांना स्तनपान करण्यासाठी “ हिरकणी कक्ष”ची उभारणी महिला व बालविकास विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या ३% निधी मधून ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या मार्फत केले जात आहे. ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सर्व सोयीयुक्त अशा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
     या प्रसंगी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायधीश उपस्थित होते.  या सुविधांची गरज सर्व ठिकाणी असावी, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे यांनी केले. ठाणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या आवारामध्ये या कक्षाची उभारणी करावी, असे निर्देश दिले.संबंधित न्यायालयीन अधिकारी यांना महिला व बालविकास विभागास कक्ष उभारणी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे व समन्वय साधून काम करण्याबाबत आदेशित केले.
      जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी महिला व बालविकास विभागातर्फे स्मृतीचिन्ह भेट देवून पाहुण्यांचा स्वागत केले. या प्रकारच्या उपक्रमास न्यायपालिकेने ज्या संवेदनशिलतेने न्यायालयात येणाऱ्या मातांचा विचार करुन कक्ष उभारणीस परवानगी दिली व त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील अडचणी लक्षात घेवून पुढील आदेश दिले, याबाबत विभागातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, ठाणे जिल्हा न्यायालयाचे रजिस्ट्रार कंठे आणि महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माेलाचे सहकार्य केले.

error: Content is protected !!