Homeठाणे-मेट्रोठाणे मनोरुग्णालयात रुग्णांसाठी खेळीयाड !

ठाणे मनोरुग्णालयात रुग्णांसाठी खेळीयाड !

क्रिकेट, रस्सी खेच, लगोरी, संगीत खुर्ची कॅरम, आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

ठाणे : एखादा मोठा आघात अथवा इतर कारणांनी मानसिक स्वास्थ्य ढासळलेल्या व्यक्तीला सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. उपचारासाठी मनोरुग्णालयाचा मोठा आधार असला तरी अशा व्यक्तींसाठी कौटुंबिक मायेचा ओलावा आणि सांघिक खेळाच्या जोडीने मानसिक आजारातून व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतगार ठरू शकते. हाच धागा पकडून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांसाठी खेळीयाड २०२५ आयोजन करण्यात आले असून यावेळी क्रिकेट, रस्सी खेच, लगोरी, संगीत खुर्ची, कॅरम, आदी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आठवडाभर चालणाऱ्या खेळ महोत्सवात मनोरुग्ण, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मैदानी आणि इंडोर गेम्स स्पर्धा रंगणार आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, बुक बॅलंसिंग, बटाटा शर्यत, कॅरम, रिंग टारगेट, संगीत खुर्ची क्रिकेट, रस्सीखेच आदी खेळ खेळले जाणार असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ सुधीर पुरी यांनी दिली

खेळीयाड २०२५ च्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. या खेळीयाड मध्ये क्रीडास्पर्धा बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल बघायला मिळणार आहे. या प्रसंगी
वैद्यकिय उपअधीक्षक डॉ प्राची चिवटे, डॉ. ममता आळसपुरकर, डॉ. अर्चना गडकरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन लांजेवार, डॉ. सुरभी रानडे, डॉ. विजया खांडेपारक सुधीर पुरी, , सुनील कोर, नितीन शिवदे. आदी मान्यवर उपस्थित होते. आदी उपस्थित होते.

” ११ फेब्रुवारी १८९५ हा रुग्णालयाचा स्थापना दिवस असल्याकारणाने, दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयातील सुधारणाऱ्या रुग्णांसाठी विविध मैदानी खेळांचे व वैयक्तिक खेळाचे आयोजन केले जाते. यासाठी नियोजन समिती , अर्थ समिती ,सांस्कृतिक समिती, स्वागत समिती आणि क्रीडा इत्यादी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे रुग्णालयातील पुरुष विभागातील १३ कक्ष, व महिला विभागातील १० कक्ष मध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जाणार आहेत “-

डॉ. नेताजी मुळीक (वैद्यकिय अधीक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय)

error: Content is protected !!