Homeठाणे-मेट्रोठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पत्र्याच्या शेडवरील सुक्या पालापाचोळ्याला आग

ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पत्र्याच्या शेडवरील सुक्या पालापाचोळ्याला आग

ठाणे:- ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील पत्र्याच्या शेडवर असलेल्या सुक्या पालापाचोळ्याला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेने प्लॅटफॉर्म क्रमांक १ व प्लॅटफॉर्म क्रमांक २ ची रेल्वे लाईन (डाऊन लाईन) १० मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आली होती. तसेच काही मिनिटात त्या लाईन पुन्हा सुरू करण्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनची रेल्वे सेवा सुरळीत झाली.
ठाणे रेल्वे स्टेशन, या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील पत्र्याच्या शेडवर असलेल्या पालापाचोळा, कचऱ्याला व बाजूला असलेल्या झाडाला आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर, रेल्वे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी २० मिनिटात त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!