Homeठाणे-मेट्रोठाण्याच्या येऊरमध्ये बिबट्याचे दर्शन

ठाण्याच्या येऊरमध्ये बिबट्याचे दर्शन

ठाणे:- येऊर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून दोन बिबटे जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा प्रकार गुरुवारी पहाटे साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या दरम्यानचा आहे. निर्सगरम्य असलेल्या येऊरमध्ये गेल्या काही वर्षांपासून मॉर्निंग वॉकला जाण्याची संख्या अधिक असल्याने आता ठाणे वनविभागाची याबाबत जनजागृतीसाठी धावपळ सुरू झाली आहे. तसेच येऊर वन परिक्षेत्रात बिबट्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मध्यंतरी बिबट्याचे दर्शन होत नव्हते. त्यातच अचानक एक नाहीतर दोन बिबट्याचे दर्शनाने झाल्याने त्यांचा अधिवास अजूनही येऊर जंगलात कायम असल्याचे दिसत आहे.
येऊरच्या मुख्य रस्त्याला लागून एअर फोर्स कॅम्प आहे. तेथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या मुख्य रस्त्यावरून गुरुवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास दोन बिबटे जात असल्याचे दिसले. बिबट्यांच्या दर्शनाने मोठया प्रमाणात अतिक्रमण होऊन ही अद्यापही येऊर जंगलात बिबटे आपले अस्तित्व टिकून असल्यानेही ती आनंददायी गोष्ट समोर आली आहे. त्यामधील एक बिबट्या पूर्णवाढ झालेला म्हणजे तो साधारणपणे तीन वर्षांचा तर दुसरा हा एक वर्षांचा असा अंदाज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकाऱ्यांनी व्यक्त आहे. ज्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले आहे ती वहिवाट गावकऱ्यांची आणि मॉर्निंग वॉक करण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता या भागात जनजागृतीचे फलक बसविण्यात येणार आहे. त्याच्यावर बिबट्या दिसल्यास नागरिकांनी
काय करावे आणि काय करु नये, याबाबतीची माहिती असणार आहे. असेही वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!