ठाणे :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी गुरूवार 21/08/2025 रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 22/08/2025 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यत ठाण्यातील काही भागात एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर, मानपाडा प्रभागसमितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.