येत्या ०७ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी-गणपती या सणाला येत्या ०३ ते ०६ सप्टेंबर दरम्यान मुख्य वाहतुक केली जाणार आहे. यंदा दोन हजार ०३२ गाड्यांचे नियोजन ठाणे (एसटी) विभागाने केले आहे. त्यापेक्षा अधिक जवळपास ५०० गाड्यांची बुकिंग झाल्याने अशाप्रकारे दोन हजार ४८१ बसेस हाऊसफुल होऊन ठाणे विभागीय कार्यालयाची विक्रमी नोंद झाली आहे. गतवर्षापेक्षा यंदा ५०० अधिक गाड्यांची संख्येत वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. विविध सवलतीमुळे पुन्हा एसटीला पसंती देत प्रवासी एसटीकडे वळताना दिसत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत.
■ ही आहेत प्रमुख बसेस सुटण्याची ठिकाणे
ठाणे- खोपट,बोरिवली, भाईंदर,मुलुंड, भांडूप, डोंबिवली,कल्याण, विठ्ठलवाडी आणि दिवा अशी आहेत.
■ या विभागांची ठाण्याला मदतीचा हात
ठाणे विभागाच्या मदतीला एकूण एक हजार ७०० गाड्या धावून आल्या आहेत. गतवर्षापेक्षा ६० गाड्या यंदा जादा आहेत. यंदा मुंबई प्रादेशिक, पुणे प्रादेशिक आणि नाशिक प्रादेशिक येथील गाड्यांचा समावेश आहे.
■ जाताना पाच तर येताना तीन ठिकाणी थांबा
कोकणात मुंबई गोवा महामार्गाने जाताना चाय पान आणि प्राथमिक विधीसाठी पाच हॉटेल च्या ठिकाणी थांबा दिला आहे. तसेच येताना तीन ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे.
■ गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या रवाना
ठाणे विभागाकडून संपाच्या दिवसात योग्य नियोजन करून ३ सप्टेंबरला २२, ४ सप्टेंबर ४८२ गाड्या सोडण्यात आल्या. तर गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या रवाना झाल्या आहे. तर ५ सप्टेंबर ला ९६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.






