Homeठाणे-मेट्रोठाण्यातून दिघेसाहेबांचे अस्तित्व पुसण्याचे षड्यंत्र कोण करतंय?

ठाण्यातून दिघेसाहेबांचे अस्तित्व पुसण्याचे षड्यंत्र कोण करतंय?

टीएमसीला प्रवेश द्वाराच्या निर्मितीचा मुहूर्त मिळेना, केदार दिघेंचा आरोप

ठाणे:- जवळपास दीडवर्षे झाले धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार उभारण्यास दुर्लक्ष केले जात असून ठाण्यातून दिघे साहेबांचे अस्तित्व पुसण्याचे काम महापालिकेकडून होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून जरी हे होत असलं तरी यामागे कोणाचं अदृश्य हात आहे आणि कोणाचं हित साधलं जातंय?

धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने असलेला प्रवेशद्वार वर्षाभरापूर्वी महापालिकेने काढला मात्र वर्षे उलटूनही त्या ठिकाणी नव्याने प्रवेशद्वार उभारण्याचे काम महापालिका करत नसल्याने यामागे नेमका उद्देश काय असा सवाल केदार दिघे यांनी विचारला आहे.दिघे साहेबांचे अस्तित्व ठाण्यातून पुसण्याचे काम कोण करत आहे का याचे उत्तर आता टीएमसीने द्यावे असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.

प्रशासनाकडून ठाण्यात दिखाव्यासाठी वरवर रंगरंगोटी करत आहेत, दीपस्तंभ उभे करत आहेत मग आनंद दिघे साहेबांच्या प्रवेशद्वाराचे वावडे का आहे हे स्पष्ट करावे. खरतर महापालिका प्रशासनाने तातडीने दिघेसाहेबांच्या नावाने असणारे प्रवेशद्वार उभारायला हवे होते मात्र यामध्ये होणारी दिरंगाई चिंताजनक आहे असेही केदार दिघे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!