Homeठाणे-मेट्रोठाण्यात आठ गोविंदा जखमी

ठाण्यात आठ गोविंदा जखमी

ठाणे: ठाण्यामधील दहीकाला उत्सवाच्या पंढरीत माखन चाखण्यासाठी मानवी मनोरे उभारताना, आठ गोविंदा जखमी झाले असून दोन जणांवर रुग्णालयात उपचार आहे. तर, कार्तिक माने (१३), श्रेयस पाटील (१८), श्रवण कांबळे (१९), प्रतीक ठोके (१२) आणि अनिश चंद्रवंशी (२०), तेजस गाडे (२४) अशी किरकोळ दुखापत झालेल्या गोविंदांची नावे असून त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. तसेच जिग्नेश तांबले (२६) याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. ऋषिकेश धायबर (२१) त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्या दोघांवर कळवा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते सर्व गोविंदा हे ठाण्यातील असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

error: Content is protected !!