ठाणे :- झाडाची फांदी घरावर पडून मायलेक असे तिघे जखमी झाल्याची गोकुळ नगर, आझाद नगर २ येथे शुक्रवारी ( ता.०५) सकाळी समोर आली. अर्चना पाटील (२७) त्यांचा मुलगा आदित्य (१०) आणि कार्तिक (०७) अशी जखमी मायलेकांची नावे आहेत. तसेच त्या घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. तसेच ते शिर्के यांच्या मालकीचे असून तेथे पाटील कुटुंब भाड्याने राहत आहेत. या घटनेत अर्चना पाटील यांच्या कानाला तर आदित्य याच्या उजव्या पायाला आणि कार्तिक याच्या डोक्याला पायाला दुखापत झाली आहे. तसेच पडलेल्या झाडाची फांदी कापून एका बाजूला करण्यात आली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.