ठाणे: शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील तुळशीधाम रोडवरील धर्मवीर नगरचा बस स्टॉप रस्त्याचा एका बाजूला कोसळला. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी त्या बस स्टॉपवर कोणी नसल्याने मोठे अनर्थ टळले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी घटनेत ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. याशिवाय त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग केले. तसेच त्या घटनेची माहिती संबंधित विभागाला देत, कार्यवाहीबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.






