Homeठाणे-मेट्रोठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम ; झाड कापताना कुत्र्याचा अग्निशमन दलाच्या जवानांवर...

ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम ; झाड कापताना कुत्र्याचा अग्निशमन दलाच्या जवानांवर हल्ला

दोन जवान जखमी

ठाणे: गावदेवी बस स्टॉपच्या आवारात बुधवारी रात्री पावणे अकरा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक एक झाड कोसळले. ते झाड कापताना रवींद्र शेळके (३७) आणि सूर्यवंशी विसपुते (२६) या दोन ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्या भटक्या कुत्र्याने त्या दोन्ही जवानांच्या उजव्या पायाला चावा घेतला असून जखमी जवानांना तातडीने ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. अशाप्रकारे ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम असल्याचे पुन्हा एखादा समोर आले आहे.
बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत भालेराव यांनी मोबाईलवरून गावदेवी बस स्टॉप येथे झाड पडल्याची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. तसेच ते पडलेले झाड कापत असताना अग्निशमन दलाच्या दोन जवानांवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये ते दोन्ही जवान जखमी झाले आहेत. दरम्यान पडलेल्या झाडाचा धोकादायक भाग अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांमार्फत कापण्यात आला असून उर्वरित भाग ठामपा वृक्षप्राधिकरण विभागामार्फत कापून बाजूला करण्यात आला.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!