स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका महाराष्ट्रात मराठीचा वापर करा संदेश असलेली प्रतिमा दिली भेट
मराठीचा वापर करण्यासंदर्भात शासनाने दिलेल्या आदेशांची करून दिली आठवण
ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मनसैनिकांना महाराष्ट्रातील बँकेतील व्यवहार तसेच महाराष्ट्रातील आस्थापना यांना मराठीचा वापर प्रामुख्याने केले पाहिजे असे सांगितल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यात टपाल विभागाला दणका देण्यात आला टपाल विभाग भारत सरकारच्या अंतर्गत येणारा विभाग असून महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन आदेशाचा अनुषंगाने महाराष्ट्रात असलेल्या शासकीय, निमशासकीय व इतर शासन संचालित अस्थापनांना आपल्या दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर प्रामुख्याने करणे अनिवार्य केले आहे तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित आस्थापनांचे प्रमुख तसेच शासनाची मराठी भाषा समिती यांना दिली आहे पण असे असून सुद्धा या आदेशाची पायमल्ली ठाण्यातील टपाल विभाग राजरोजपणे करत असल्याकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी ठाण्यातील पोखरण रोड येथील टपाल कार्यालयात धडक देऊन तेथील विभागीय प्रमुख यांना शासनाने दिलेल्या आदेशाची आठवण करून दिली तसेच स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका महाराष्ट्रात मराठीचा वापर करा असा संदेश असलेली प्रतिमा भेट देण्यात आली व येत्या पंधरा दिवसात सदर टपाल विभागातील व्यवहार मराठी भाषेत झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नमूद केले सदर आंदोलन दिनकर फुलसुंदर, दत्ता चव्हाण, मनीष सावंत ,प्रकाश महाले ,किशोर पाटील ,संतोष कांबळे, संदीप कडू, कृष्णा देवकोटा आदी उपस्थित होते.
* चौकट
डाकघर मधील बहुतेक कर्मचारी परप्रांती असून सदर कर्मचारी जाणून बुजून मराठी लोकांना मराठी फॉर्म व साहित्य नसल्याचे वारंवार सांगत आहेत.
” ठाणे शहरातील केंद्रशासन संचालित विविध आस्थापना यांच्या मध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने करावा व तसे न झाल्यास मनसेच्या वतीने सदर आस्थापनांना धडा शिकवण्यात येईल. “- स्वप्नील महिंद्रकर ,ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभाग मनसे.