सुटकेनंतर जंगलात रवानगी
ठाणे :- येऊर जंगलात एकाच वेळी दोन बिबट्याचे दर्शन झाले असताना, आता ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कासारवडवली,साईनगर येथील एमबीसी पार्क येथे एका हरणाचे दर्शन झाले. ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या त्याला हरणाला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले आहे. तसेच त्या हरणाच्या एका पायाला जखम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच त्याला जंगलात मुक्त करण्यात आले आहे.
सदर पार्क हे घोडबंदर रोड परिसरातील जंगलात उभारण्यात आले आहे. जंगल असल्याने ते हरण रविवारी सांयकाळी या परिसरातील दिसून आले होते. त्यानुसार त्याचा काल शोध घेण्यात आला, पण ते मिळून आले नव्हते. सोमवारी दुपारी एमबीसी पार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये हरण अडकल्याची माहिती मिळताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाच्या रेस्क्यू पथकाने धाव घेतली. तसेच त्या हरणाला काही तासातच सुरक्षितरित्या रेस्क्यू करून त्या ट्रान्सफॉर्मर केबिनमधून सुटका केली. तसेच ते हरण मादी जातीचे असून त्याच्या मागील एका पायाला जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.