Homeठाणे-मेट्रोठाण्यात ७१० विदेशी मद्यासह बिअर बॉक्स जप्त; नाताळ आणि नववर्षच्या पार्श्वभूमीवर ठाणे...

ठाण्यात ७१० विदेशी मद्यासह बिअर बॉक्स जप्त; नाताळ आणि नववर्षच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन विभागाची कारवाई

ठाणे : हिमाचल प्रदेश आणि गोवा या सारख्या राज्यातील निर्मित मद्याची चोरट्या पध्दतीने वाहतूक करणाऱ्या एका सहा चाकी वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. तसेच या वाहनामधील त्या दोन्ही राज्यातील निर्मित विदेशी मद्य व बिअर बॉक्स असे ७१० बॉक्स सह वाहन असा मुद्देमाल जप्त केला असून त्याची किंमत ५५ लाख ७९ लाख रुपये आहे. याप्रकरणी चालक पूनमा राम धोकला राम गोदारा यास अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली. ही कारवाईत नाताळ आणि नववर्षच्या पार्श्वभूमीवर केल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.
नाताळ आणि नव वर्ष स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात. या पार्श्‍वभुमीवर होणारी अवैद्य मद्य विक्रीसह वाहतूक रोखण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन विभाग देखील सज्ज झाला आहे. त्यानुसार शिळफाटा परिसरात शुक्रवारी सायंकाळी राज्य उत्पादन विभागाचे भरारी पथक १ चे पथक गस्तीवर असतांना भारत गियर कंपनी जवळ संशय आल्याने त्या वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य फॉर सेल इन द स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश तसेच गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य व बिअर बॉक्स असे ७१० बॉक्स आढळून आले. त्यानुसार ठाणे राज्य उत्पादन विभागाने या प्रकरणी भारतीय बनावटीचे विदेशी मद्य फॉर सेल इन द स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश तसेच गोवा राज्य निर्मित दारू बंदी कायद्यांतर्गत साठा व सहा चाकी वाहन असा ५५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली. ही कारवाई ठाणे राज्य उत्पादन अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भारार्पथक १ निरीक्षक एम.पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एस.आर. मिसाळ आदींच्या पथकाने केली.

error: Content is protected !!