Homeठाणे-मेट्रोठाण्यात ८२ मद्यपींची उतरवली झिंग ; विना हेल्मेटच्या ४१३ केसेस

ठाण्यात ८२ मद्यपींची उतरवली झिंग ; विना हेल्मेटच्या ४१३ केसेस

ठाणे:- धुळवड साजरा करताना, मद्यप्राशन करून गाड्या चालवणाऱ्या मद्यपी वाहन चालकांवर ठाणे शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून उगारण्यात आला होता. त्यानुसार ठाणे शहर वाहतूक विभागाच्या १८ युनिटच्या पोलिसांनी ८१ मद्यपींची झिंग उतरवली. तसेच विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४१३ तर दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या २७४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्वाधिक २० मद्यपींची कल्याण परिमंडळात झिंग उतरविण्यात आली असून कल्याणमध्ये सर्वाधिक १४९ विना हेल्मेटच्या तर उल्हासनगर परिमंडळात सर्वाधिक १६० केसेस ट्रिपल सीटच्या नोंदविण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
होळी आणि धुळवड निमित्त ठाणे शहर पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट, विना हेल्मेट याच्या विरोधात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळात विशेष मोहीम वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी १८ युनिटांद्वारे त्या- त्या परिमंडळातील विशिष्ट नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करून ही कारवाई केली आहे. त्यानुसार ड्रंक अँड ड्राईव्हच्या ८१,विदाऊट हेल्मेट ४१३ आणि ट्रिपल सीट २७४ अशा एकूण ८६८ केसेस नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाईचा तक्ता
परिमंडळ/ ड्रंक अँड ड्राईव्ह/विना हेल्मेट/ट्रिपल सीट
ठाणे शहर /१५/८५/१५
वागळे इस्टेट/१९/९९/१२
भिवंडी/१३/४८/१६
कल्याण/२०/१४९/७१
उल्हासनगर/१४/३२/१६०
एकूण/८१/४१३/२७४

error: Content is protected !!