Homeठाणे-मेट्रोडेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो स्पायरोसिस रुग्णांसाठी संजीवनी ठरणार एफेरेसिसी मशीन

डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो स्पायरोसिस रुग्णांसाठी संजीवनी ठरणार एफेरेसिसी मशीन

ठाणे सिव्हील रुग्णालयात एफेरेसिसी मशीनद्वारे आवश्यक रक्तघटक सहज उपलब्ध

ठाणे :- रक्ताच्या एका पिशवीत रक्ताचे वर्गीकरण केल्यावर मिळणाऱ्या घटकांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे अनेकदा रक्तातील प्लेटलेट्स, प्लाझ्मा घटक शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत असली तरी आता सिव्हील रुग्णालयात शरीरातून रक्तातील हवा तो घटक काढून घेण्याचे एफेरेसिसी मशीन तैनात ठेवण्यात आले आहे. गरजेनुसार रक्तदात्या कडून केवळ प्लेटलेट्स, प्लाझ्मा, लाल पेशी काढली जाणार आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरोसिस, गर्भवती महिला आदींसाठी लागणाऱ्या प्लेटलेट्स मिळवण्यासाठी दमछाक कमी होणार आहे.
आजकाल डेंग्यू मलेरिया अथवा लेप्टो स्पायरोसिस सारखा ताप आल्यावर अनेकांचा थरकाप उडतो. अशा तापावर त्वरित उपचार मिळाले नाही की जीवावर बेतू शकत. शरीरातील प्लेट लेट्सची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे रक्त गोठण्याची क्रिया क्षीण होऊन जाते. प्लेट लेट्स मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते. खाजगी रक्तपेढी मध्ये प्लेट लेट्स साठी खर्च ही जास्त होतो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब बनते. परंतु सिव्हील रुग्णालयात आधुनिक एफेरेसिसी ही मशीन आणली आहे. या मशीनद्वारे रक्त दात्याच्या रक्तातील हवा तो घटक काढता येणे शक्य झाले असल्याची माहिती रक्तपेढी प्रमुख डॉ. गिरीश चौधरी यांनी दिली.

रक्तदान केल्यानंतर शरीरातून साधारण ३५० मिली लीटर रक्त काढले जाते. यामध्ये अवघ्या प्लेटलेट्सची संख्या साधारण ५००० हजार इतकी असते. मात्र एफेरेसिसी मशीनमुळे रुग्णासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.या मशिद्वारे रक्तदात्याच्या शरीरातून ५० हजार प्लेटलेट्स काढता येणार असून, प्लेट लेट्सच्या एक पिशवीत रुग्ण बरा होण्यास मदत मिळणार आहे. सद्यस्थितीत ही मशीन सुरू करण्यात आली आहे. या मशीनची पाहणी करतेवेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल राहुड, डॉ. गिरीश चौधरी, विनोद जोशी उपस्थित होते.

” एकदा रक्त दिलं की तीन महिन्यांनी रक्तदान करावे. मात्र एफेरेसिसी मशीनमुळे रक्तातील प्लेट्स काढल्या ते आठवड्यातून दोन वेळा देखील तुम्ही प्लेट्स देऊ शकता. प्लेटलेट्स प्रमाणे प्लाझ्मा, लाल पेशी आणि शुद्ध रक्त काढण्याची सोय आहे. या मशीनवर एका रक्तदात्याने प्लेट लेट्स काढल्या आहेत.”- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे.

error: Content is protected !!