Homeकोकण-महाराष्ट्रडॉक्टरांची चॅम्पिअन्स ट्रॉफीउल्हासनगर सुपरकिंग्ज संघ ठरला विजेता

डॉक्टरांची चॅम्पिअन्स ट्रॉफी
उल्हासनगर सुपरकिंग्ज संघ ठरला विजेता

कल्याण:-मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयाने डॉक्टरांसाठी चॅम्पिअन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले होतं. या स्पर्धेत वोक्हार्ट रुग्णालयाचे डॉक्टर्स सहभागी झाले होतेच,शिवाय कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि आंबिवलीमधले इतर डॉक्टरही सहभागी झाले होते. डॉक्टरांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश होता. या स्पधेमध्ये एकूण 18 संघ सहभागी झाले होते, ज्यांच्यात एकूण 25 सामने खेळवण्यात आले. डॉक्टरांच्या या क्रिकेट स्पर्धेत 200 डॉक्टर्स सहभागी झाले होते. 
 
या स्पर्धेच्या अंतिम सामना हा केम्प्स्वा योद्धा आणि उल्हासनगर सुपर किंग्स, या संघात खेळवण्यात आला होता. या सामन्यात योद्धा संघाने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या संघाने 5.4 षटकांत 8 बाद 57 धावा केल्या होत्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या उल्हासनगर सुपरकिंग्ज संघाने 4 गडी गमावत 4.2 षटकांत 60 धावा फटकावत लक्ष्य गाठले.  हा सामना अत्यंत उक्तंठावर्धक असा ठरला.
 
या स्पर्धेबाबत बोलताना मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयाचे केंद्र प्रमुख डॉ.विरेंद्र चौहान म्हणाले की, “ डॉक्टर्स हे कमालीच्या तणावाखाली काम करत असतात. हा ताण हलका व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचं कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि आंबिवली भागात आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमुळे डॉक्टरही आनंदले होते आणि ते या सामन्यांसाठी बरेच उत्सुक होते. कर्तव्यावर असताना डॉक्टरांच्या खांद्यावर काय जबाबदारी असते आणि त्याचा शरीरावर तसेच मनावर काय परिणाम होतो याची आम्हाला कल्पना आहे.  डॉक्टर हे शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या सुदृढ राहावेत यासाठी वोक्हार्ट रुग्णालयातर्फे आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. मी या स्पर्धेचे विजेते उल्हासनगर सुपर किंग्स यांचे आणि उपविजेते केम्प्स्वा योद्धा यांचे अभिनंदन करतो.”
 
2023 साली झालेल्या डॉक्टरांच्या चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
उल्हासनगर चैंपियंस, उल्हासनगर स्मॅशर, उल्हासनगर किंग्स इलेवन, क्रेजी कल्याणकर, उल्हासनगर सुपर किंग्स, कल्याण ऑलराउंडर्स, सिद्धिविनायक स्मार्टी, डोंबिवली वारियर्स, डोंबिवली टाइटन्स, अंबिवली इंडियंस, केम्प्स्वा एवेंजर्स, केम्प्स्वा नाइट राइडर्स, केम्प्स्वा रॉयल्स, केम्प्सवा वारियर्स, केम्प्स्वा योद्धा, न्यूटेक टाइगर्स, कल्याण मावेरिक, वॉकहार्ट दबंग.

error: Content is protected !!