Homeकोकण-महाराष्ट्रडॉ.श्रीकांत शिंदेंची विकास कामेच प्रचंड,ते मोठ्या मतांनी तिसऱ्यांदा खासदार होतील-शैलेश पाटील

डॉ.श्रीकांत शिंदेंची विकास कामेच प्रचंड,ते मोठ्या मतांनी तिसऱ्यांदा खासदार होतील-शैलेश पाटील

दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी पत्रबाजी करू नये

दिवा:-कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून धनुष्यबाण चिन्हावरच डॉक्टर श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा खासदार होतील असे सांगताना खा.श्रीकांत शिंदेंची विकास कामेच इतकी आहेत की प्रचार न करता सुद्धा प्रचंड विक्रमी मताने खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील असा विश्वास शिवसेनेचे दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दिवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवा असे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिल्यानंतर दिव्यातील शिवसेनेचे नेते शैलेश पाटील चांगलेच आक्रमक झाले असून श्रीकांत शिंदे यांचे काम संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रचंड असून त्यांच्यासमोर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा टिकाव लागणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह कल्याण लोकसभेतील प्रत्येक मतदाराच्या मनात असून कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.त्यामुळे दिव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे महत्त्व वाढून घेण्यासाठी पत्रबाजी करू नये असा टोला शैलेश पाटील यांनी लगावला आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघात मागील दहा वर्षात अनेक विकास काम केली.अनेक प्रकल्प आणले. येथील पायाभूत सुविधांसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण मतदार संघाचा नियोजनबद्ध विकास करण्यास श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये एकीकडे विरोधी पक्षांना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवार सापडत नसताना युतीतील पक्षाने विनाकारण विरोधकांना टीका करण्यासाठी संधी मिळेल अशी वक्तव्य करू नयेत असा सल्लाही शैलेश पाटील यांनी दिला आहे.दिव्यातील सर्वसामान्य भाजप कार्यकर्ते हे महायुतीसोबत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिव्यातील उत्तर भारतीय हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे दिव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःचे महत्त्व टिकून ठेवण्यासाठी अशी पत्रबाजी करावी लागत असल्याचा सणसणीत टोला शैलेश पाटील यांनी लगावला आहे.

error: Content is protected !!