दिवा:- चार वर्षे प्रेमाच्या आणाभाकानंतर अचानक तरुणाने गावी जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने दिवा शहरातील २२ वर्षीय तरुणी मानसिक तणावाखाली गेली. याचदरम्यान त्या तरुणीने तरुणासमोर उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. दरम्यान तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यानंतर १४ दिवसांनी सदर तरुणीचा मृत्यू झाला आहे.
सदर तरुणीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
सदर मयत तरुणी रत्नागिरी येथील मूळ रहिवासी असून ती गेल्या काही वर्षांपासून दिवा परिसरात बहिणीकडे राहत आहे. त्या २२ वर्षीय तरुणीचे चार वर्षांपासून दिव्यात राहणाऱ्या महेश नामक तरुणाबरोबर प्रेमसंबंध सुरू होते. याचदरम्यान त्याने अचानक गावी जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने ती तरुणी मानसिक तणावाखाली होती. १ जून रोजी ती तरुणी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर न जेवताच झोपी गेले. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बहिणीला ५ वाजण्याच्या सुमारास कामाला जाते सांगून घराबाहेर पडली. सात वाजण्याच्या सदर तरुणीने बहिणीला फोन करून महेश याच्या घराबाहेरच विषप्राशन केल्याचे सांगितले. तिला उपचारार्थ दिव्यातील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याचे सांगितले.
याबाबत त्या तरुणीला विचारणा केले असता, तिचे महेश याच्यासोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू आहे. तसेच गावी जाऊन त्याने दुसऱ्या मुलीची लग्न केले. तसेच त्याने तिला भेटून तिच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगितल्यावर रात्रीपासून ती तरुणी मानसिक तणावाखाली होती. तसेच सकाळी पाच वाजता त्याच्या घरी जाऊन त्याला लग्न करणार का याबाबत विचारणा केले असता, त्याने तिला लग्न करणार नाही. तेव्हा तिने त्याला विचारले, मी काय करू तेव्हा तो बोलला की तू मेलीस तरी चालेल. पण तो तिच्याशी लग्न करणार नाही असे सांगितले. याच रागात त्या तरुणाच्यासमोरच तिने विषप्राशन केले. उपचारादरम्यान ३ जून रोजी तिची अचानक तब्येत जास्त झाल्याने डॉक्टरांनी तिला जे जे रुग्णालय हलविण्यास सांगितले. जे जे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, १४ जून रोजी दुपारी त्या तरुणीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. असे त्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी महेश या तरुणाच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.






