ठाणे :- हातात कोयता, तलवार घेऊन धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणाऱ्या भिवंडी, कशेळी येथील तेजस विजय हारुगले (२१) वागळे इस्टेट मधील अप्पा प्रभाकर चौगुले (१९) आणि सावरकर नगर येथील सागर उर्फ रूपेश सिताराम दळवी (३१) या त्रिकुटाला वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले २ कोयते १ तलवार अशी हत्यारे जप्त केली आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.
वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यात पाहिजे असलेले तिघे वागळे इस्टेट
जुनी बिअर कंपनी, रोड नं. १६ जवळ येथे हत्यारांसहित लपून बसले आहेत.अशी माहिती
वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली. ही कारवाई सहा पोलीस आयुक्त शोध १ गुन्हे शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक ५ वागळे इस्टेट ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सहायक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, शरद पाटील, पोलीस हवालदार विजय काटकर, सुशांत पालांडे, हर्षद तारी, पोलीस नाईक रघुनाथ गार्डे, उत्तम शेळके, सचिन बंडगर, तेजस ठाणेकर, पोलीस शिपाई मिनीनाथ शिकारे यश यादव या पथकाने कारवाई केली आहे.