Homeठाणे-मेट्रोतीव्र उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी जाळीचे आच्छादन ; ठामपाचा प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम

तीव्र उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी जाळीचे आच्छादन ; ठामपाचा प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम

ठाणे :- सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये, म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर गोखले रोड वरून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचे आच्छादन टाकण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोखले रोड वरील ही जाळी १०० फूट लांब, २५ फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून २० फूट एवढी आहे. या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. आणखी काही ठिकाणी अशाप्रकारे जाळी उभारण्याचा ठाणे महानगरपालिकेचा मानस आहे

error: Content is protected !!