Homeठाणे-मेट्रोतोल जाऊन पडलेल्या महिला पोलिसांची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

तोल जाऊन पडलेल्या महिला पोलिसांची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

ठाणे : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बुधवारी घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर शिंदे निघताना महिला पोलीस शिपाई रुपाली साळुंखे यांचा तोल गेला, त्या मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्यासमोरच जमिनीवर पडल्या आणि त्यांना दुखापत झाली. हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या समोर झाल्याने त्यांनी तातडीने धाव घेत, विचारपूस केली. तसेच साळुंखे यांना झालेली दुखापत पाहून त्यांना रुग्णालयात भरती करण्याबाबतची सुचना केली. मुख्यमंत्र्यांनी दाखववेलेल्या त्याच्या साधेपणामुळे महिला पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.

h dfghfg fgh f

error: Content is protected !!