रक्तदान करणाऱ्या महिलेस साडी भेट तर पुरुष मंडळींना कोंबडा भेट दिला जाणार
दिवा:-रक्तदान हेच श्रेष्ठदान हा नारा देत दिव्यातील दक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेमध्ये 26 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व दानधर्मांमध्ये रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचे सांगत नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक राजकांत पाटील यांनी केले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक महिलेस मायेची साडी भेट म्हणून दिली जाणार असून रक्तदान करणाऱ्या पुरुष मंडळींसाठी कोंबडा भेट दिला जाणार आहे.तर कोणतीही भेटवस्तू न स्वीकारणाऱ्या नागरिकास अडीचशे रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीची भेट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक राजकांत पाटील यांनी दिली. अशा पद्धतीने आयोजित केलेल्या या अनोख्या रक्तदानाची शिबिराची चर्चा दिवा शहरात आहे. पाटील हे आपल्या विविध व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नेहमीच चर्चेत असतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदीप पॅलेस येथील शाखेजवळ हा उपक्रम 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असल्याचे राजकांत पाटील यांनी सांगितले.