दिवा:-शुक्रवारी पहाटे दातिवली तलावाची संरक्षण भिंत कोसळली. यावेळी बाजूला उभी असणारी रिक्षा व मोटरसायकल तलावात पडली.त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत दातिवली तलावाच्या थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे.
दातीवली तलावाच्या कामावर अनेक वेळा खर्च झाला असून अद्यापही हे तलाव पूर्ण स्थितीत झालेले नाही,याकडे लक्षवेधताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दातिवली तलावाच्या कामात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे. दातिवली तलावाच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, महिला शहर संघटिका ज्योती पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, नागेश पवार, यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.