दिवा:-दातिवली तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत दिवा मनसेने तलावाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच तलावाचा कोणताही भाग बुजवून खाजगी वापरासाठी त्याचा वापर होऊ नये असेही मनसेचे प्रकाश पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. दातिवली तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. या संदर्भात मनसेचे प्रकाश पाटील व प्रशांत गावडे यांनी कार्यकर्त्यासह तलावाच्या ठिकाणी भेट देऊन आज संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.