ठाणे : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमताने मिळविल्यावर, ठाणे शहर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वर्तकनगर विभागीय कार्यालयाबाहेर विजयी जल्लोष केला. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोल वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. हरियाणा, महाराष्ट्रापाठोपाठ भाजपाने दिल्लीतही देदिप्यमान रचून इतिहास रचला, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केलो.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथे विजयोत्सवात भाजपाचे पदाधिकारी, विविध प्रकोष्टचे प्रमुख, मंडल पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपाची संघटनात्मक रणनीती आणि पक्षाने देशभर राबविलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला. दिल्लीतील जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली.