Homeशहर परिसरदिवा स्थानकात कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय,ठाणे दिशेने फलाट क्रमांक आठ पर्यंत पादचारी...

दिवा स्थानकात कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय,ठाणे दिशेने फलाट क्रमांक आठ पर्यंत पादचारी फुल उपलब्ध करून देण्याची मागणी

दिवा:-कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबई,ठाणे, डोंबिवली परिसरातील रेल्वे प्रवाशांना कोकणात जाताना फलाट क्रमांक एक व दोन वरून कोकण रेल्वेच्या फलाट क्रमांक आठ वर जाण्यासाठी ठाणे दिशेने ब्रिज उपलब्ध नसल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.

अनेक वेळा प्रवासी फलाट क्रमांक एक व दोन वरील ठाणे दिशेच्या पादचारी पुलाचा वापर करतात मात्र त्यांना फलाट क्रमांक पाचवर उतरून पुन्हा कोकण रेल्वे फलाट क्रमांक आठ वर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. परिणामी ठाणे दिशेने फलाट क्रमांक एक व दोन वरून कोकण रेल्वेच्या फलाट क्रमांक आठवर जाण्यासाठी थेट पादचारी फुल उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी दिव्यातील कोकण प्रतिष्ठानच्या वतीने दिवा रेल्वे स्टेशन मास्तरांची भेट घेऊन करण्यात आली.यावेळी कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवदत्त घाडी, कार्याध्यक्ष प्रशांत गावडे, रमेश शिंदे, प्रीतम शिंदे, संगीता उत्तेकर, श्रुतिका उत्तेकर आधी उपस्थित होते. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकातील सोयी सुविधा वाढवण्यात याव्यात व प्रवाशांची दिशाभूल होऊ नये यासाठी ठाणे दिशेकडून असलेला पादचारी फुल कोकण रेल्वेच्या पलाट क्रमांक आठवर सध्या स्थितीत जात नाही अशा आशयाचे फलक या ठिकाणी लावण्यात यावे,जेणेकरून प्रवाशांची फसगत होणार नाही अशी मागणी ही कोकण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.

error: Content is protected !!