Homeठाणे-मेट्रोदिवा गाव येथे श्रीगणेश,श्री हनुमान, श्रीराम, लक्ष्मण,सीता मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा...

दिवा गाव येथे श्रीगणेश,श्री हनुमान, श्रीराम, लक्ष्मण,सीता मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

दिवा:– श्री हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ मंडळ दिवा स्टेशन यांच्या वतीने श्री गणेश, श्री हनुमान, श्रीराम, लक्ष्मण,सीता या देवतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच मंदिर जिर्णोद्धार सोहळा रविवारी संपन्न झाला. परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याअंतर्गत शुक्रवारी सकाळपासून मूर्तींचा मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात वाजत गाजत पार पडला. तर शनिवारी कलश यात्रा पार पडली.रविवारी प्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला.रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला.यावेळी दिवा ग्रामस्थ महिला भगिनी तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

error: Content is protected !!