Homeठाणे-मेट्रोदिवा डम्पिंग बंद करण्यासाठी भाजपने अडवल्या गाड्या

दिवा डम्पिंग बंद करण्यासाठी भाजपने अडवल्या गाड्या

दिवा: दिवा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी भाजप घेतलेल्या पवित्र्यानंतर सोमवारी भाजप आणि स्थानिक दिवावासीय चांगले आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यांनी सोमवारी सकाळी दिवा डम्पिंग गाउंडवर येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्या. अचानक  पुकारलेल्या आंदोलनामुळे भाजप आणि स्थानिक नागरिकांनी ठाणे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य वेधण्याचे काम केले. यावेळी येत्या दहा दिवसांत डम्पिंग बंद न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा ही आंदोलनकर्त्यांनी दिला. तर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
         निवडणुकाजवळ आल्या की दिव्याला दिवा डम्पिंग बंद करण्याचे खोटे आश्वासन वारंवार देण्यात येत आहे. असा आरोप भाजपने केला.तसेच या संदर्भात दिवा भाजपने काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना लेखी निवेदन दिले होते. त्यामध्ये येत्या दहा दिवसात दिवा डंपिंग बंद करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही दिला होता. त्यानुसार सोमवारी ठाणे शहर आमदार संजय केळकर व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी गटनेते मनोहर डुंबरे,मिलिंद पाटणकर, दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यातील नागरिकांनी व भाजप पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी दिव्यातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले होते. त्यामुळे  दिवा डम्पिंगला जाणाऱ्या सर्व कचऱ्याच्या गाड्या अडविण्यात आल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासन व दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांनी दिवा डम्पिंग लवकरात लवकर बंद करू असं आश्वासन देण्यात आले. दरम्यान पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत, सोडून दिले. तर येत्या दहा दिवसात जर डम्पिंग बंद केले नाहीत तर पुन्हा दिव्यातील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.  या आंदोलनात गणेश भगत, विजय भोईर ,मुंब्रा मंडल अध्यक्ष कुणाल पाटील ,शील मंडल अध्यक्ष बाळाराम पाटील ,दिवा संघटक सरचिटणीस दिलीप भोईर ,युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर ,महिला अध्यक्ष ज्योती पाटील झओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, दिवा उपाध्यक्ष महेंद्र भगत सीमा भगत ,पंकज सिंग ,वीरेंद्र गुप्ता ,अवधराज राजभर ,युवती प्रमुख विशाखा, दांडेकर अमीता तांबे ,जिनल सोळंकी ,मुकेश जयस्वाल, जीलाजित तिवारी व शेकडो कार्यकर्ते उपस्तिथ होते

error: Content is protected !!