दिवा:– दिवा ते डोंबिवली स्टेशन यादरम्यान ठाणे महानगरपालिका परिवहन मार्फत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून या बस सेवेचा शुभारंभ झाला.
दिवा शिवसेनेचे शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी, उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दिवा शहरातील शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने व पुढाकाराने ही बस सेवा सुरू करण्यात आल्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.या बस सेवेमुळे दिवा डोंबिवली दरम्यान रस्ता मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार असून दिवा शहरातील गणेश नगर, आगासन, मानपाडा, बेतवडे या भागात जाणाऱ्या नागरिकांनाही या बसचा फायदा होणार आहे.