Homeसंपादकीयदिवा न्यूजचे दुसऱ्या वर्षात पदार्पण!

दिवा न्यूजचे दुसऱ्या वर्षात पदार्पण!

निपक्ष भूमिका,विकास पत्रकारिता आणि वाचकांचा प्रतिसाद!

 दिवा शहरातून प्रसिद्ध होणारे दिवा न्यूज वर्तमानपत्र दुसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे.मागील वर्षभरात सकारात्मक आणि विकास पत्रकारिता करताना दिवा न्यूजने आपले सातत्य जपले आहे.वर्तमानपत्र ही समाजाचा आरसा असतात असं आपण नेहमी म्हणतो.आज समाजातील समस्यांचे वास्तव वर्तमानपत्र म्हणून मांडणे आवश्यक बनले आहे. दिवा न्यूज आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा आरसा बनू पाहत आहे. दिव्यासारख्या छोट्या शहरातून प्रसिद्ध होणारे दिवा न्यूज हे पहिले वर्तमानपत्र असून हळूहळू या वर्तमानपत्राचा विस्तार ठाणे शहर आणि अन्य भागात होत आहे.शासन,प्रशासन, महापालिका त्याचबरोबर शासकीय यंत्रणा यांची जबाबदारी आणि नागरिकांची कर्तव्य याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. सक्षम समाज घडवण्यासाठी वर्तमानपत्रांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.येत्या वर्षांमध्ये आम्ही हा संकल्प घेऊन वाचकांपर्यंत पोहोचणार आहोत.स्थानिक वर्तमानपत्र म्हणून वाटचाल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो,मात्र स्थानिक वाचक वर्ग दिवा न्यूजला प्रचंड प्रतिसाद देत असल्याने दर सोमवारी प्रसिद्ध होणारे दिवा न्यूज  वर्तमानपत्र आता डिजिटल स्वरूपात सुद्धा वाचकांच्या भेटीला येणार आहे. दिवा न्यूजची वेबसाईट आणि ई-पेपर सुद्धा उपलब्ध असणार आहे. दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी वाचकांना संकेतस्थळावर वाचायला मिळणार आहेत. दिवा शहरातून प्रसिद्ध होणारे दिवा न्यूज हे वर्तमानपत्र आगामी काळात ठाणे आणि लगतच्या भागांमध्ये पोहोचवण्याचा आमचा मानस असून लोकहितवादी पत्रकारिता दिवा न्यूजच्या माध्यमातून होईल हा विश्वास आम्ही देतो. हितचिंतक, जाहिरातदार दिवा न्यूज वर्तमानपत्र सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करणारे कर्मचारी,विक्रेते या सर्वांचे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आम्ही आभार व्यक्त करतो.दिवा शहरातील वाचकांनी अल्पावधीतच या वर्तमानपत्राला प्रतिसाद दिला त्याबद्दल वाचकांना धन्यवाद देतो.

error: Content is protected !!