Homeशहर परिसरदिवा पूर्व येथील सहयोग भवन सोसायटीमध्ये तळमजल्यापर्यंत पावसाचे पाणी; शिवसेना उपशहरप्रमुख अँड....

दिवा पूर्व येथील सहयोग भवन सोसायटीमध्ये तळमजल्यापर्यंत पावसाचे पाणी; शिवसेना उपशहरप्रमुख अँड. आदेश भगत यांच्या मदतीने नागरिकांना दिलासा

दिवा :- दिवा शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, नागरिकांची गैरसोय झाली आहे. दिवा पूर्व येथील साबे रोडवर असलेल्या सहयोग भवन सोसायटीमधील चार इमारतींच्या तळमजल्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली होती.
यावेळी, स्थानिक रहिवाशांनी शिवसेना उपशहरप्रमुख अँड. आदेश भगत यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदत मागितली. शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार, अँड. आदेश भगत यांनी तात्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली.
अँड. आदेश भगत यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर, पाण्याचा त्वरित निचरा करण्यासाठी त्यांनी तात्काळ पंपांची व्यवस्था केली. त्यांच्या या तातडीच्या उपाययोजनांमुळे सोसायटीतील पाणी उपसले गेले आणि रहिवाशांना दिलासा मिळाला. या मदतीबद्दल स्थानिक रहिवाशांनी अँड. आदेश भगत यांचे आभार मानले.

error: Content is protected !!