दिवा – ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्वच प्रभाग समिती हद्दीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 33 मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली.
सर्वंकष स्वच्छता मोहीम ही फक्त ठाणे शहरात मर्यादित न राहता ती महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक प्रभागात राबविली गेली पाहिजे या हेतूने महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रत्येक आठवड्यात प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग 33 या ठिकाणी ही मोहीम राबविताना ठाणे शहर, दिवा, मुंब्रा, कळवा अशा पद्धतीने राबविण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या होत्या.
त्यानुसार आज दिवा प्रभाग समिती 33 अंतर्गत वाय जंक्शन ते कौसा तलाव तसेच चरणी पाडा रोड व परिसर येथे सर्वकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेची शपथ घेत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.दरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभाग मार्फत 150 सफाई कर्मचारी व दोन जेटिंग गाडी, जेसीबी, डंपर लहान मोठ्या 10 घंटागाड्या होते सदर मोहिमेंतर्गत एकूण 14 टन कचरा व माती उचलण्यात आले. तसेच रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्यात आले. तसेच विविध ठिकाणी चिकटविण्यात आलेले जाहिरातीची पत्रके काढण्यात आली.
स्वच्छता मोहिमेसाठी उद्यान विभाग, अतिक्रमण विभाग, फायलेरिया विभाग बांधकाम विभाग उपस्थित होते. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आरोग्य अधिकारी राणी शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया उपमुख्य स्वच्छता निरीक्षक डोगर परदेशीं. लक्ष्मण पुरी गौरी तांबे स्वच्छता निरिक्षक तसेच बांधकाम विभागाचे उप अभियंता सचिन कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.






